IMPIMP

Pune District Mining and Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंद मागे; प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्याने बंद मागे घेत असल्याची घोषणा

by sachinsitapure

पुणे : Pune District Mining and Crusher Industries Association | जिल्ह्यातील दगडखाण आणि क्रशर व्यावसायीकांच्या काही मागण्या मान्य झाल्या असून उर्वरीत मागण्या पुर्ण करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्‍वासन शासनाकडून मिळाल्यामुळे पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंद रविवारी मागे घेण्यात आला. असोसिएशनने २१ जून पासून बंद पुकारल्यानंतर खाजगी बांधकामांसोबतच शासकिय बांधकामांवरही परिणाम झाला होता.

जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या गौण खनिज विभागाने स्थापन केलेल्या भरारी पथकातील अधिकार्‍यांच्या उपद्रवामुळे पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने २१ जून पासून जिल्ह्यात बंद पुकारला होता. शासन स्तरावर व्यावसायीकांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेउन मागील आठवड्यात ते भरारी पथक बंद करण्याचे आदेश दिले होते. यानंतर असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप कंद, राम दाभाडे, उपाध्यक्ष रामदास काकडे, सचिव योगेश ससाणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत चर्चा केली. शासनाकडून व्यावसायीकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच उर्वरीत मागण्यांसाठी धोरण तयार करण्याचे आश्‍वासन दिले. या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनच्या सदस्यांची काल वाघोली येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये रविवारी संध्याकाळपासून संप मागे घेण्यात असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच असोसिएशनने १सप्टेंबर २०१९ ला तयार केलेल्या दरपत्रकानुसार मालाची विक्री करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले, अशी माहिती असोसिएशनचे सचिव आणि माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिली.

Related Posts