IMPIMP

Pune Gang Rape | धक्कादायक ! पुण्याच्या वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, शहरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Raped minor girls and made them pregnant Two cases were registered in two incidents in one day in Pune Koregaon Park Lonikand Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये (Pune Gang Rape) दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी दत्तवाडी परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Pune Gang Rape) केल्याची घटना घडली असताना पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच घटना घडली होती. आता पुण्यातील वानवडी (Wanwadi) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर (minor girl) सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आरोपींनी पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण (Kidnapping) केले. पीडित मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी (Wanwadi police) 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. ही घटना रविवारी (दि.5) सायंकाळी वानवडी परिसरात घडली असून ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी मुलीला रिक्षात बसवून एका ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेतील पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजतेय. ही घटना समजताच वानवडी पोलिसांनी 7 नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींसोबत त्यांचे इतर साथिदार देखील असल्याचे समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात (Court) नेण्यात आले असून पोलीस त्यांच्या इतर साथिदारांचा शोध घेत आहेत. ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने याबाबत संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे पोलिसांकडून (Pune Police) सांगण्यात येत आहे.

 

 

Web Title : Pune Gang Rape | Shocking! 14-year-old girl gang raped in Pune’s Wanwadi area, huge commotion in the city

 

हे देखील वाचा :

EPFO | ‘पीएफ’वर 8.5 टक्के व्याजाची मिळाली मंजूरी, दिवाळीपूर्वी मिळू शकते रक्कम; जाणून घ्या

Post Office | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दरमहा होते कमाई, द्यावा लागत नाही टीडीएस; ‘इतकी’ करावी लागेल गुंतवणूक, जाणून घ्या

Skin Care Tips | लॅपटॉप आणि मोबाइलच्या अधिक वापरामुळे तुमच्या त्वचेचे होऊ शकते नुकसान, ‘या’ पध्दतीनं काळजी घ्या

 

Related Posts