IMPIMP

Pune Hadapsar Crime | पुणे : तरुणीकडे पाहून भररस्त्यात अश्लील हावभाव, आरोपीला हडपसर पोलिसांकडून अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | अल्पयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते शनिवार (दि.16) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हडपसर परिसरातील वैदवाडी येथे घडला आहे.

याबाबत 17 वर्षाच्या पीडित मुलीने रविवारी (दि.17) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश शंकर आलकुंटे (वय-35), सुनिल शंकर आलकुंटे (वय-40 दोघे रा. शंकरमठ, आलकुंटे वस्ती, वैदवाडी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 354, 354 (अ) (ड), 452, 509, 506, 34 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अविनाश आलकुंटे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित तरुणीचा डिसेंबर 2023 पासून वारंवार पाठलाग केला. शनिवारी सायंकाळी मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपी अविनाश याने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करुन घाणेरडे आवाज काढले. तसेच तिला काडीने टोचून तिच्यासोबत जवळीस साधण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केला. तसेच तिला धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील मेसेज करुन विनयभंग
लोहगाव : व्हॉट्सअॅप ग्रुपवर (WhatsApp Group) महिलेबाद्दल अश्लील मेसेज करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित 43 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.16) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी केशव क्षिरसागर (वय-32) व भैरवनाथ गायकवाड (वय-28) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील मेसेज केला. तसेच व्हॉट्सअॅप कॉल करुन अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Punit Balan Group (PBG) | इंद्राणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Related Posts