IMPIMP

Pune Lok Sabha | साड्या वाटप धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना भोवलं, निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल

by sachinsitapure

पुणे :  – Pune Lok Sabha | पुणे लोकसभा मतदार संघातील प्रचार संपण्यास काही तास शिल्लक असताना मतदारांना प्रलोभन दाखवून आकर्षीत करण्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे (Mahavikas Aghadi Congress Candidate) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाने साड्या वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांना भोवले आहे. निवडणुक भरारी पथाकाकडून याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) निवडणुक आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्याकडे भाजपच्या कार्यकर्त्या माधवी निगडे यांनी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची हिंदमाता प्रतिष्ठान संस्था आहे. हिंदमाता प्रतिष्ठानच्या (Hindmata Pratishthan) माध्यमातून पुणे शहरातील लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे विविध विधानसभा मतदारसंघात संत महंत व शक्ती पीठाचे पादुकांचे दर्शनाचे व महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले होते. ज्याचे फ्लेक्स शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

पर्वती मतदारसंघातील सहकारनगर येथे सातव हॉल (Satav Hall Sahakar Nagar) याठिकाणी हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमस्थळी रवींद्र धंगेकर यांचे प्रचाराचे फ्लेक्स लावलेले होते. कार्यक्रमात साडी वाटप करण्यात आले. मतदारांना प्रलोभन देण्यात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक कार्य़क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे पोस्टर विना परवानगी लावून मुद्र, प्रकाशक न छापता लावण्यात आले होते. याठिकाणी भरारी पथकाने जाऊन पाहणी केली असता कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांकडे साड्यांचे पुठ्ठ्यावर रवींद्र धंगेकर यांचे नावाचे पोस्टर्स दिसून आले. याबाबत कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Sharad Pawar Sabha In Chakan | चाकण मध्ये धडाडणार शरद पवारांची तोफ ! चाकणच्या मार्केटयार्डात पवारांची डॉ. कोल्हेंसाठी जाहीर सभा

Related Posts