IMPIMP

Pune Lok Sabha | निकालापूर्वीच पुण्यात झळकले विजयाचे बॅनर, भाजपसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजयाचा दावा (Video)

by sachinsitapure

पुणे : – Pune Lok Sabha | देशात सध्या लोकसभा निवडणुका होत आहे. सोमवारी देशासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, शिरूर (Shirur Lok Sabha) आणि मावळ (Maval Lok Sabha) या तीन लोकसभा मतदार संघात मतदान झाले. या तिनही मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवर (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी चांगलीच लढत दिली. तर राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha) नणंद-भावजय निवडणुकीच्या रिंगणात असून ही लढत लक्षवेधी ठरली. तसेच शिरुरमध्ये विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यात लढत होती. सोमवारी मतदान झाल्यानंतर आता दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असून तसे बॅनर देखील पुण्यात लावण्यात आले आहेत.

‘कर्वे रोड ते कर्तव्य पथ’

सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शहरातील दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून विजयाचे बॅनर झळकवण्यात येत आहे. भाजपच्या काही कर्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर शहरात लावले आहेत. पुण्यातील बाणेर परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर ‘कर्वे रोड ते कर्तव्य पथ’ असा मजकूर आहे. यामध्ये मुरलधीर मोहोळ यांच्यासह पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांचाही फोटो लावण्यात आला आहे. मोहोळ यांच्या नावाच्या आगोदर ‘खासदार’ या शब्दाचा उल्लेख करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

‘गुलाल आमचाच’, मविआचा दावा

दुसरीकडे पुणे शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) सुप्रिया सुळे (Supriya Sule), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयचा बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये ‘गुलाल आमचाच’ असं म्हणत महाविकास आघाडीने तिनही उमेदवार विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. हा बॅनर अमित आबा बागूल (Amit Bagul) आणि मित्र परिवारातर्फे लावण्यात आला आहे.

पुण्याचा गड कोण जिंकणार?

पुणे लोकसभा मतदारसंघात यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा 3.7 टक्के अधिक मतदान झाले आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. हा परिणाम नेमका कोणत्या लाटेचा आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कसबा (Kasba Vidhan Sabha), पुणे कॅटोन्मेंट (Pune Cantonment Assembly Constituency) , कोथरुड (Kothrud Assembly Constituency) आणि पर्वती (Parvati Assembly Constituency) या प्रमुख विधानसभा मतदारसंघात टक्केवारी वाढली आहे. कसबा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जातो. परंतु, वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. या निवडणुकीत कसबा मतदारसंघात 59.24 टक्के मतदान झाले. या परिस्थितीत भाजपला गेल्या निवडणुकीसारखी आघाडी मिळणार की, धंगेकर पोटनिवडणुकीत दाखवलेला चमत्कार पुन्हा दाखवणार अशी चर्चा आहे.

Sanjay Shirsat On Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेच्या हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या ‘त्या’ बॅगा पैशाच्या, संजय राऊतांच्या आरोपाला शिरसाट यांचे प्रत्युत्तर (Video)

Related Posts