IMPIMP

Pune Lok Sabha | पर्वती विधानसभा मतदारसंघात पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ! सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया – यशोमती ठाकूर

by sachinsitapure

पुणे : Pune Lok Sabha | सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महा विकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल (Aba Bagul) यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एक हजारहून अधिक पालकांची उपस्थिती होती.

यावेळी ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहे, जो सर्व धर्म समभाव जोपासणारा आहे. आपल्या थोर महापुरुषांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही.त्यासाठीच महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी थोर महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेवून सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया आहे.त्यासाठी सदैव कटिबध्द राहायचे आणि काँग्रेसचे हात बळकट करायचे हा निर्धारही करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास ठप्प झाला आहे. विकासाची दूरदृष्टी ही काँग्रेसकडे आहे. धार्मिक द्वेषाची पेरणी करून शहरांची काय देशाची प्रगतीही होणार नाही. सर्व धर्म समभाव असेल तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होणार आहे. आजचा जो विकास झालेला दिसतोय त्यामागे काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता पुण्याच्या विकासाचे समीकरण दृढ करायचे असेल तर रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचे आहे. असेही आबा बागुल म्हणाले. यावेळी पूजा आनंद, घनःश्याम सावंत, मसलकर, संतोष गेळे आदींसह पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dr. Machindra Sakte | संविधान बदलणे किंवा रद्द करणे शक्य नाही; डॉ. मच्छिंद्र सकटे यांचे प्रतिपादन

Related Posts