IMPIMP

Pune News | खते, बियाणे व किटकनाशके आदी निविष्ठांच्या विक्रीसंबंधातील तक्रार WhatsApp वर करता येणार

by sachinsitapure

पुणे: Pune News | खते, बियाणे व किटकनाशके आदी निविष्ठांच्या खरेदीप्रसंगी दुकानदारांकडून जादा दराने विक्री, खरेदी पावती न देणे, एका निविष्ठेसोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे, मुदतबाह्य – निविष्ठा विक्री करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी कळविण्यासाठी जिल्हास्तरावर 9158479306 हा व्हॉटसअॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या अडचणी आल्यास त्यांनी दिलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी. त्यावर शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.

Related Posts