IMPIMP

Pune News | योगेश शांडिल्य-तिवारी मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी, औषधोपचार शिबिर

by sachinsitapure

पुणे: Pune News | नारायण पेठेतील (Narayan Peth Pune) योगेश शांडिल्य-तिवारी (Yogesh Shandilya-Tiwari) मित्र परिवारातर्फे पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी, औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते. डॉ अधीर तांदळे, डॉ ज्योती शाळीग्राम, डॉ सुभाष गुंदेचा यांनी 509 रुग्ण तपासले. नितीन पोरे, धीरज डूंगरवाल यांनी औषधे उपलब्ध करून दिली तर सुहास बोरावके, रितेश शांडिल्य, गणेश जाधव, कमलाकर बालघरे, सदानंद म्हसवडे, मधूर गेहलोत, राकेश वंजारी यांनी शिबिराचे संयोजन केले.

गुडघे, कंबर व पायदुखीच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे डॉ तांदळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमोदग्लोबीन कमी असणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय होती.

वारकऱ्यांचा पुढील प्रवास वेदनारहित व सुखकर व्हावा किंबहुना कोणत्याही आजारामुळे त्यात खंड पडू नये या उदेशाने गेली सतरा वर्षे या शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे योगेश शांडिल्य यांनी सांगितले.

या शिबीराला ह ब प साधवी वैष्णवी सरस्वती, भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे, माजी नगरसेविका सौ मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजपा शहर सचीव निलेश कोंढाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Posts