IMPIMP

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी

by sachinsitapure

पुणे : Pune Patrakar Pratishthan | पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पत्रकार शैलेश काळे (Shailesh Kale) यांची तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी (Prasad Kulkarni) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच विश्वस्तपदी चंद्रकांत हंचाटे (Chandrakant Hanchate) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश काळे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, विश्वस्त चंद्रकांत हंचाटे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे (Pune Shramik Patrakar Sangh) अध्यक्ष पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor) यांनी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष काळे, कुलकर्णी, हंचाटे यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही पुणे श्रमिक पत्रकार संघाची मातृ संस्था आहे. १९९१ मध्ये तिची स्थापना झाली आहे. पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही सभासदांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली सेवाभावी संस्था आहे.

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, मनोरुग्ण थेट पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर चढला (Videos)

Related Posts