IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने हटकले, दोघांकडून थेट गोळीबार; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगावात खळबळ

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात गोळीबाराच्या (Firing In Pune) घटना घडत असताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीत देखील गोळीबाराची घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने (Police Sub Inspector – PSI) हटकल्याने चोरट्यांनी थेट गोळीबार (Firing In Pimpri) केल्याची घटना तळेगाव दाभाडे (Firing In Talegaon Dabhade) येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळील कॉलनीत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे (PSI Shyam Shinde) यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. शिंहे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) कार्य़रत आहेत. दरम्यान, घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी शाम शिंदे कॉलनीत आले होते. त्यावेळी कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या बाहेर एक संशयित थांबल्याचे आढळून आले. संशयिताने तोंडाला मास्क लावला होता.

शाम शिंदे यांनी त्या व्यक्तीला हटकले ‘तू कोण आहेस, येथे कशासाठी आलास, कोणाकडे आला, कोणाला भेटायचे आहे’ असे संशयिताला विचारले. त्याचा राग आल्याने त्याने शिंदे यांना उर्मट उत्तर दिले. ‘ए चल तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हूँ’ असे तो म्हणाला. त्यानंतरही शाम शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने खिशातील पिस्तूल बाहेर काढून शिंदे यांना दाखवले.

शिंदे यांनी आरडाओरडा केला. ‘चोर आले चोर आले’ असे म्हणून त्यांनी कॉलनीतील इतर लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत असलेला एक चोरटा बाहेर आला. त्याने भिंतीवरुन उड मारली आणि बाहेर थांबलेल्या त्याचा साथीदार असे दोघे दुचाकीवरुन पळून जाऊ लागेल. त्याचवेळी कॉलनीतील काही जण त्याठिकाणी आल्याने दुचाकीवरील संशयिताने त्याच्या पिस्तूलातून एक गोळी जमिनीवर झाडली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरुन पळून गेले.

घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर (DCP Bapu Bangar), सहायक आयुक्त देविदास घेवारे (ACP Devidas Gheware) यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

ACB Trap Case | दहा हजार रुपयांची लाच घेताना वनपाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी घेतली लाच

Related Posts