IMPIMP

Pune Politics News | भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंचे अरविंद शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हे म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्यांनी…’

by sachinsitapure

पुणे: BJP Dheeraj Ghate On Congress Arvind Shinde | लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदू बाबत केलेल्या विधानामुळे पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले आहेत. अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारलेली असून बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह “खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल” असा मजकूर छापण्यात आला आहे.

त्यावरून आता काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ” भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. तू कधी मरशील हे माहित नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांचे कर्मच तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केले होते. या वक्त्यव्याला शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

धीरज घाटे म्हणाले, ” अरविंद शिंदे यांना त्यांच्या नेत्यावर केलेली टीका चांगलीच झोंबलेली दिसत आहे. कारण त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे. आणि हिंदूंचा कोणताही अपमान झाल्यास भाजपचा कोणताही कार्यकर्ता शांत बसणार नाही. हिंदू धर्मियांवर केलेल्या टीकेला आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. शिंदेंचा तोल ढासळला असून त्यांच्या नेत्याने संसदेत जसे विधान केले तसेच आपणही काहीतरी माध्यमांसमोर बरळून चर्चेत यायचं हेच अरविंद शिंदे यांनी पुण्यात केले आहे.

ते पुढे म्हणाले, ” पुण्याला राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलणं योग्य नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणं हे म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्यांनी व्यसनमुक्तीवर भाषण करण्यासारखं आहे. गेल्या ते ३५ वर्षापासून संघाच्या संस्कारात काम करत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे कर्म काय करायची हे चांगलं माहिती आहे. तुम्ही आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल”, असे धीरज घाटे म्हणाले आहेत.

Related Posts