IMPIMP

Pune Politics News | “तू कधी मरशील हे…” ; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंबाबत काँग्रेसच्या अरविंद शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य

by sachinsitapure

पुणे: Congress Arvind Shinde On BJP Dheeraj Ghate | लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदू बाबत केलेल्या विधानामुळे भाजपकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत (Rahul Gandhi Statement Against Hindu). या वक्तव्यावरून राज्याच्या विधानपरिषदेतही गोंधळ पाहायला मिळाला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसत आहेत. पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले आहेत. (Pune Politics News)

अनेक चौकांमध्ये लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारलेली असून बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह “खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल” असा मजकूर छापण्यात आला आहे. त्यावरून आता काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्त्यव्याच्या निषेध आंदोलनात माध्यमांशी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की , “भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. तू कधी मरशील हे माहित नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांचे कर्मच तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की , हिंदूंच्या नावावर हिंसा केली जाते, लोकांना भीती घातली जाते, ते लोक हिंदू नाहीत. खरा हिंदू असे कधीच करत नाही हे राहुल गांधी म्हणाले. भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने शब्द फिरवून वेगळे नरेटीव्ह तयार केले जात आहे. तिनके को डुबने का सहारा असा प्रकार चालला असून हिंदू कधीही अत्याचार करत नाही, इतर समाजाचा आदर करतो हेच राहुल गांधी म्हंटले असल्याचे देखील अरविंद शिंदे म्हणाले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याबाबत केलेल्या विधानाने पुन्हा नवा वादंग निर्माण होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Related Posts