IMPIMP

Pune Porsche Accident Case | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : चालकाच्या अपहरण प्रकरणात अग्रवाल बाप-लेकाला जामीन मंजूर

by sachinsitapure

पुणे :  – Pune Porsche Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Car Accident Pune) कारचालक अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर दबाव आणत चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (Vishal Surendrakumar Agarwal)आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendrakumar Agarwal Builder) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय-42) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करुन त्याचा मोबाईल काढून धमकावल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्ता अग्रवाल (वय-77) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय-50 दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांच्या न्यायालयात (Pune JMFC Court) हा अर्ज करण्यात आला होता.

तक्रारदार चालक हा पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार आहे. आरोपींनी चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवत अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. कार चालकाचे कपडे आरोपींच्या बंगल्याच्या खोलीमधून जप्त केले होते.

या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींनी छेडछाड केली आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते पुन्हा पुराव्यात छेडछाड करु शकतात. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आरोपींनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करुन पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न केला आहे. आरोपींना जामीन झाल्यास ते पुन्हा तपासात अडथळे आणू शकतात, असा युक्तीवाद करत सरकार पक्षातर्फे जामिनाला विरोध केला.

Related Posts