IMPIMP

Pune Porsche Car Accident Case | रक्त तपासणीपूर्वी डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीच्या वडीलांमध्ये नेमकं काय झालं?

by sachinsitapure

पुणे : Pune Porsche Car Accident Case | पुणे पोर्शे कार अपघातात अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी प्रशासनातील विविध विभाग कसे कामाला लागते होते, हे आता बाहेर येऊ लागले आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमूने (Swapping Blood Sample) ससूनमधील (Sassoon Hospital) ज्या दोन डॉक्टरांनी बदलले त्यापैकी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांच्यापैकी डॉ. तावरे याचे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यापूर्वी त्याच्या वडीलांशी तब्बल १४ वेळा बोलणे झाले आहे.

डॉ. तावरे आणि इतर दोघांनी आरोपीच्या कुटुंबाकडून रक्त नमुने बदलण्यासाठी लाच घेतली असून पुढील चौकशीसाठी त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी (Pune Crime Branch) सोमवारी न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) केली होती.

एका पोलीस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आला. आरोपीचे वडील आणि डॉ. तावरे यांचे कॉल रेकॉर्ड तपासले असता रक्ततपासणी करण्याच्या दोन तास आधी त्या दोघांमध्ये १४ वेळा संभाषण झाल्याचे समोर आले आहे.

तसेच आरोपीच्या वडीलांनी काही कॉल व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि स्टँडर्ड सेल्युलर कनेक्शनवरही केले आहेत. या कॉल रेकॉर्डची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. आरोपीचे वडील आणि डॉ. तावरे यांच्यात कोण मध्यस्थी करत होता? याचाही तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Related Posts