IMPIMP

Pune Rural Police | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस; 3 आरोपींकडून 5 चोरीचे गुन्हे उघडकीस

by nagesh
Pune Rural Police | ATM theft case revealed in Shirur; 5 theft cases uncovered from 3 accused

शिक्रापुर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) : Pune Rural Police | पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) सरदवाडी येथील एटीएम (ATM) मशीन फोडून नुकसान करणाऱ्या आरोपींच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने मुसक्या आवळल्या असून एटीएम चोरीच्या गुन्हासह 4 दुचाकी जप्त करुन 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट (Police Inspector Padmakar Ghanwat) यांनी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी आकाश उर्फ निलेश अनिल गायकवाड (वय 27७ वर्षे रा.नेवासा, ज्ञानेश्वर मंदिर रोड, ता.नेवासा जि.अहमदनगर), तन्मय उर्फ सोनल संदिप साळवे (वय 21 वर्षे रा. नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर), अशिष माणिक डुकरे (वय 21 वर्षे रा. नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर) या आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी धनंजय दशरथ गायकवाड (वय 28 वर्ष रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलिस स्टेशन (Shirur Police Station) मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

 

सविस्तर माहिती अशी की, 20 जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुणे-नगर रोडवरील, सरदवाडी येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम (Axis Bank ATM) कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गॅस कटरचे (Gas cutter) सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला होता व एटीएमच्या रूममध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच एटीएमच्या मशीनचे नुकसान केले होते.

 

 

या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींची आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून माहिती काढली असता ते नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजली. पोलिसांच्या पथकाने अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar district) जाऊन त्यांच्यावर पाळत ठेवून आरोपी यांनी वाळूंज एमआयडीसी (Walunj MIDC) येथून चोरलेल्या दोन मोटारसायकली बेलापूर येथे विक्री करणेसाठी आले असता त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 7 दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रेच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून 1 बजाज पल्सर, 1 होंडा शाइन व अहमदनगर एमआयडीसी येथून 1 होंडा शाइन व तोफखाना येथून 1 होंडा पॅशन प्रो अशा एकूण 4 मोटरसायकली चोरी केल्याची कबूली दिली.

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale), पोलीस हवालदार
महेश गायकवाड, पोलीस हवालदार, निलेश कदम, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, सचिन
गायकवाड, राजू मोमीन, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, पोलीस नाईक अजित भुजबळ, अभिजित
एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Rural Police | ATM theft case revealed in Shirur; 5 theft cases uncovered from 3 accused

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोनं 210 रुपये तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांची घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

Pune Crime | पुण्यातील निलंबीत पोलिसावर खुनी हल्ला, दोघे ताब्यात तर 9 जणांविरूध्द FIR

Viral Video | रस्ता ओलांडताना करू लागले छेडछाड, हत्तीने तरूणांला चिरडून मारून टाकले (व्हिडीओ)

 

Related Posts