IMPIMP

Pune Water Supply | पुणेकरांना दिलासा! तुर्तास पाणी कपात टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

by sachinsitapure

पुणे :  – Pune Water Supply | मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात होणाऱ्या संतधार पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) साडे चार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होतो. खडकवासला धरण प्रकल्पात 4.35 पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे तुर्तास पाणी कपातीचे संकट टळले आहे. (Pune Water Storage)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चारही धरणांतील पाणी साठी कमी होऊन 3.50 टिएमसी इतका झाला होता. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येत असल्याने जलसाठ्यात पाऊण टीएमसी वाढ झाली आहे. पालखीसाठी कालव्यातून 500 क्युसेक्स पाणी सोडले आहे. पुणे महानगरपालिका धरणातून रोज 1700 क्युसेक्स पाणी उचलत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

– खडकवासला: 41.01 टक्के
– टेमघर: 3.05 टक्के
– वरसगाव: 10.39 टक्के
– पानशेत: 19.67 टक्के

चारही धरणं मिळून एकूण 4.35 टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठयामध्ये पाउण टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी कपात केली जाणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Posts