IMPIMP

Rahul Gandhi Sabha In Pune | पन्नास टक्के आरक्षणाबाबत मोदींनी भूमिका जाहिर करावी, आमचं ठरलंय…, राहुल गांधींनी पुण्यात स्पष्टच सांगितलं

by sachinsitapure

पुणे :  – Rahul Gandhi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे, त्यावर त्यांची भूमिका काय? त्यांनी त्यांच्या भाषणात याबाबत बोललं पाहिजे. मात्र आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवणार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

पुणे (Pune Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha), मावळ (Maval Lok Sabha) आणि बारामतीमधील (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात आज (शुक्रवार) जाहीर सभा झाली. ही सभा आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर (SSPMS Ground) सायंकाळी झाली. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule), पुण्यात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), शिरूरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe), मावळमध्ये संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली.

आजची लढाई ही संविधान वाचविण्यासाठी लढाई आहे. एकीकडे इंडिया अलायन्स संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. तर दुसरीकडे भाजप, नरेंद्र मोदी आणि आरएसएस संविधान संपवायला निघाले आहेत. ज्या दिवशी भाजप संविधान संपवेल त्या दिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. जे संविधान बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि इतर महान लोकांनी तयार केले त्याचे आम्ही संरक्षण करुन असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी राहूल गांधींच्या हातात संविधानाची प्रत होती.

अग्निवीर योजना बंद करणार

आमचे सरकार आल्यावर जाती आधारित जणगणना केली जाणार. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार असल्याचे गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल. त्याचबरोबर अग्नीवीर योजना बंद केली जाईल. जीएसटी कर बंद केला जाईल. सध्या पेपर फुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लिक करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, चारशे महिलांवर बलात्कार करणाऱ्या रेवन्नासाठी मोदी कर्नाटकात मते मागत आहेत. ज्या व्यक्तिने एवढे अत्याचार केले त्यांच्यासाठी मोदी प्रचार करत आहेत. सध्या मोदी कधी पाकिस्तानचा मुद्दा आणत आहेत तर कधी समुद्राच्या खाली जाऊन स्टंट करात आहेत. ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवार) अपमान करण्यात मोदी व्यस्त आहेत. असे वागणे देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही म्हणत राहूल गांधींनी मोदींवर प्रहार केला.

Cheating Fraud Case Pune | पुणे : ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी गजाआड

Related Posts