IMPIMP

Ravindra Dhangekar On BJP | ‘भाजपच्या थापेबाजीला पुणेकर यंदा लावणार चाप’ – रवींद्र धंगेकर

by sachinsitapure

पुणे : Ravindra Dhangekar On BJP | भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party – BJP) गेली दहा वर्ष राष्ट्रीय पातळीवर आणि अनेक वर्ष पुणे शहराच्या पातळीवर जी थापेबाजी केली आणि पुणेकरांची फसवणूक (Cheating Fraud) केली त्याला पुणेकर यंदा मतदानाच्या माध्यमातून चांगलाच चाप लावणार आहेत असे प्रतिपादन रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. (Pune Lok Sabha)

यासंदर्भात दिलेल्या एका निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की केंद्रीय पातळीवर मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, सन 2022 पर्यंत देशातील सर्वांना घरे देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, विदेशातला काळा पैसा परत आणू, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावू, अशा स्वरूपाच्या अनेक घोषणा केल्या, पण यातील प्रत्येक घोषणा ही शुद्ध थापेबाजी ठरली. यातले प्रत्यक्षात काहीही घडले नसल्याने आता २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू अशी लोणकढी थाप त्यांनी मारायला सुरुवात केली आहे आहे. 100 स्मार्ट सिटी ते देशभरात उभे करणार होते, देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करणार होते तिथेही भाजपच्या पदरी साफ निराशाच पडली आहे. (Mahavikas Aghadi)

केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर पुण्याच्या पातळीवरही गेली अनेक वर्षे आपण अशीच थापेबाजी ऐकत आलो आहोत. पुणे शहर स्मार्ट करणार, नदी सुधारणा करणार, पुण्याला 24 तास समान पाणी वाटप करणार, पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ उभे करणार, जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार, मध्य पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार, अशा भाजपच्या थापा पुणेकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. त्यामुळे हा पक्ष विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा राहिलेला नाही याची मनोमन खात्री पटल्याने या थापेबाजीला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून चाप लावण्याचा निर्धार पुणेकर नागरिकांनी व्यक्त केला आहे असेही धंगेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Related Posts