IMPIMP

Sharad Pawar NCP On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा कोर्टात जाणार; शरद पवार गटाचा इशारा

by sachinsitapure

पुणे: मनोहर भिडे नावाचा विकृत मनुवादी माणूस महिलांना नेहमी दुय्यम समजून महिलांनी कसा पेहराव केला पाहिजे याचं ज्ञान देत असतो. आता नुकतेच जीन्स घालणाऱ्या, महिलांनी, नटींनी वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करू नये अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. राजमाता माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या रणरागिणीणींनी स्वकर्तुत्वाने इतिहास रचला.अशा कर्तृत्ववान महिलांचा वारसा जपणाऱ्या महिलांचा मनोहर भिडे नामक मनुवादी विकृतीने अपमान केला. सध्या राज्यात असलेले मनुवादी सरकार हे मनोहर भिडे सारख्या विकृत मानसिकतेला नेहमीच अभय देत आले असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले.

मनोहर भिडे व त्याला बळ देणारे मनुवादी सरकार यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान चौक, जंगली महाराज रस्ता येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

“मनुवादी किडे मनोहर भिडे, मनुवादी सरकार मुर्दाबाद, मनोहर भिडे मुर्दाबाद, मी सावित्रीची वारसदार करते भिडेचा धिक्कार, मी जिजाऊंची वारसदार करते भिडेचा धिक्कार” अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दुमदुमला होता. संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा कोर्टात जाणार असा पवित्रा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, मृणालिनी वाणी, रुपाली शेलार, दिलशाद आत्तार, स्वप्नील जोशी, केतन ओरसे, राजेश आरने, संजय दामोदरे, प्रविण आल्हाट, तनया साळुंखे, भाई कात्रे, हेमंत बधे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, गणेश नलावडे, पूजा काटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts