IMPIMP

Sinhagad Road Pune Accident | सिंहगड रस्त्यावर पुन्हा भीषण अपघात; महिला जखमी

by sachinsitapure
Accident

पुणे: Sinhagad Road Pune Accident | सिंहगड रस्ता विश्रांतीनगर (Vishranti Nagar Sinhagad Road) चौकात सिमेंट मिक्सर खाली महिला सापडून अपघात झाला. जखमी महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्याला विश्रांती नगर येथे प्रकाश इनामदार चौकात राजाराम पुलाकडून (Rajaram Bridge Pune) हिंगणे कडे येणाऱ्या दिशेला हा अपघात झाला.

सिमेंट मिक्सर खाली सापडून अपघात होण्याची ही येथील दुसरी घटना आहे. यापूर्वीही एका महिलेचा सिमेंट मिक्सरच्या खाली सापडून अपघात झाला होता. दरम्यान आज अपघात घडलेल्या महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. महिलेला डाव्या पायाला इजा झाली आहे. हा अपघात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

Related Posts