IMPIMP

Sinhagad Road Pune Accident | पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; सिंहगड रोड परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे :  – Sinhagad Road Pune Accident | पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकाजवळील (Gangadham Chowk Bibvewadi) आईमाता मंदिर ते गंगाधाम चौका दरम्यान भरधाव डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आज (शुक्रवार दि.14) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका अवजड डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रस्ता परिसरातील नांदोशी (Nandoshi) येथे झाला आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

संजय राजाराम बाबर (वय- 50 रा. जावळी, जिल्हा सातारा) असे त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालक मल्लिकार्जुन नीळकंठराव बिराजदार (वय -39 रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रमाजवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. नांदोशी येथील मुख्य रस्त्यावरुन चालत जात असताना बाजूने चाललेल्या डंपरने अचानकपणे डाव्या बाजूला आपले वाहन वळवले. मात्र डाव्या बाजूने जाणारे बाबर चालकाला दिसले नसल्याने त्यांना डंपरची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे डंपरचालक व इतर डंपरचालकांनी त्यांना खाली उतरून पाहिले. तसेच त्यांना डंपर खालून बाहेर ओढून बाजूला टाकून सर्व डंपर तेथून निघून गेले. पुढील तपास हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Related Posts