IMPIMP

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

by sachinsitapure

पुणे : SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्रीमती बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजीत फडणवीस, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, भाषा व साहित्य प्रशाळेचे संचालक प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई यांच्यासह यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts