IMPIMP

ST Kamgar Sanghatna Protest | सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यवधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन

by sachinsitapure

पुणे : ST Kamgar Sanghatna Protest | सदावर्ते पती पत्नीने बँकेचे कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप करत एसटी कामगार संघटनेकडून पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि जयश्री पाटील (Jayshree Patil) या दोघांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

एसटी कामगार सहकारी बँकेत सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेचे वाटोळे करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरण केले आहे. त्यांना अटक करा. आमच्या मुलांना गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण, लग्न याला कर्जे मिळत नाही. १५० कर्मचाऱ्यांची भरती करुन लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे, त्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

बँक आमच्या हक्काची आहे. सदावर्तेच्या पूज्य वडिलांची नाही. सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे. त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये. बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्तेनी एका कंपनीला दिले असून त्या कंपनीमध्ये सदावर्तेचा काय सहभाग आहे, याचीही चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Posts