IMPIMP

Supriya Sule | पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या – ;जे सत्तेमध्ये आहेत त्यांना…’

by sachinsitapure

पुणे: Supriya Sule | खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्या मयूर साहेबराव मोहिते पाटील (Mayur Mohite Patil) बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीने चिरडल्याची घटना समोर आली. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंब येथे हा अपघात झाला.

दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनिल भालेराव (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान या अपघाताबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” हिट अँड रनच्या (Pune Hit & Run Cases) केसेस वाढत चालल्या आहेत. गृहमंत्र्यांना विनंती आहे. गेले वर्षभर नाराज होतात माझ्यावर सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते. क्राईम वाढलेला आहे.

मग ड्रग्स असू दे, पोर्शे ची केस असू दे आणि आता ही असू दे. जे सत्तेमध्ये आहेत त्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य माणसाला एक न्याय. या देशामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच हा देश चालणार आहे. कुणाची मनमान चालणार नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Posts