IMPIMP

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | ससूनमधला ‘तो’ कर्मचारी गायब; पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

by sachinsitapure

पुणे: Swapping Blood Sample-Sassoon Hospital | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील (Kalyani Nagar Accident) आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात घेण्यात आले. पण इथल्या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार करत विशाल अगरवालच्या (Vishal Agarwal Builder) मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांनी रक्ताचे नमुने बदलले. त्यासाठी त्यांना तीन लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पण आता या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा कर्मचारी नेमका कोण ?, त्याचा या प्रकरणात कोणत्या प्रकारे सहभाग होता, ते अद्याप समजू शकलेले नाही. ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील कर्मचारी सध्या नॉट रिचेबल आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अपघातानंतरचे ससून रुग्णालयतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याची तपासणी सुरु आहे. रक्त चाचणी विभागाच्या परिसरातील व्यक्तींची चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सगळ्याच जणांची चौकशी होणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही, त्याला जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) दिली आहे.

Related Posts