IMPIMP

Tamhini Ghat Plus Valley | स्टंटबाजी बेतली जीवावर, सहलीसाठी गेलेला तरुण धबधब्यात गेला वाहून; ताम्हिणी घाटातील घटना

by sachinsitapure

पुणे : – Tamhini Ghat Plus Valley | रविवारी लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonavala Bhushi Dam) पाठीमागील धबधब्यात खेळताना एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. ही घटना ताजी असतानाचं वीकेंडला सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो पिंपरी चिंचवडचा राहणारा आहे.

स्वप्नील धावडे हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील याने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो धबधब्यात उडी मारताना दिसत आहे. स्टंटबाजी करण्याच्या नादात तो पाण्यात वाहून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

शनिवारी (दि.29 जून) ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने धबधब्यातील पाण्यात उडी मारल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहासोबत वाहत गेला. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याला कडेला जाता आले नाही. ज्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. ताम्हिणीमध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मानगावमध्ये सापडला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Posts