IMPIMP

Vasant More | सोशल मीडियात हिरो असलेले वसंत मोरे पुण्याच्या मैदानात झिरो?

by sachinsitapure

पुणे: Vasant More | लोकसभा निवडणुकीपूर्वी (Pune Lok Sabha) मनसेमध्ये (MNA) अस्वस्थ असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची साथ सोडली. त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून (Sharad Pawar NCP) चाचपणी केली. परंतु तो प्रयोग यशस्वी होत नसल्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित आघाडीची साथ धरली आणि लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. परंतु या रिंगणात पुणेकरांची पसंत वसंत मोरे ठरु शकले नाहीत.

वसंत मोरे यांनी कोरोना काळात पुणेकरांसाठी जबरदस्त काम केले. पुणेकर त्यांना हक्काचा माणूस म्हणून कधीही फोन करतात. लोकांच्या प्रश्नांना सोशल मीडियातून ते दाद मिळवून देतात. त्यामुळे सोशल मीडियातील या हिरोला प्रत्यक्षात पुणेकरांनी साथ दिली नाही.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार वसंत मोरे हे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव (Anil Jadhav VBA) यांना ६५ हजार मते मिळाली होती. मात्र, त्यावेळी वंचित आणि ‘एम्आयएम’ हे एकत्र होते. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंनी ३२ हजार १२ मते मिळवली.

वसंत मोरे हे धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि मोहोळ (Murlidhar Mohol) यांना टक्कर देतील असे बोलले जात होते. मात्र तसे चित्र निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले नाही. वसंत मोरे सोशल मीडियात चांगलेच ऍक्टिव्ह असतात. त्याठिकाणी त्यांना लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. मात्र त्या फॉलोवर्सचा या निवडणुकीत करिष्मा पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सोशल मीडियात हिरो असलेले वसंत मोरे निवडणुकीच्या निकालात झिरो ठरले असल्याचे बोलले जात आहे.

Related Posts