IMPIMP

Wagholi Pune Crime News | पुणे : 10 रुपये देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन, आरोपीला अटक

by sachinsitapure

पुणे : – Wagholi Pune Crime News | एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Money) तिच्यासोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या 37 वर्षीय वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावेद उर्फ आरीफ अमीर खान (Javed alias Arif Amir Khan) याच्यावर आयपीसी 354, पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे (Molestation Case). पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहत. आरोपीने फिर्यादी यांच्या 9 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. (POCSO Act)

तसेच तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तरुणीचा खासगी फोटो केला व्हायरल

पुणे : डेटींग अॅपवर (Dating App) तरुणीचा व तिच्या मित्राचा खासगी फोटो (Private Photo Of Girl) वापरून प्रोफाईल बनवून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 31 वर्षीय पिडीत तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन निखिल सुरेश डोईफोडे Nikhil Suresh Doifode (वय-32 रा. पुनावळे, पुणे) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 6 मे 2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी (PSi Sudha Chaudhary) करीत आहेत.

Related Posts