IMPIMP

Yerawada Pune Crime News | पुणे: मानेला बंदूक लावून रिक्षाचालकाला धमकी, येरवडा परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : – Yerawada Pune Crime News | रिक्षाचालकाच्या मानेला छऱ्याची बंदूक लावून माझ्या नादी लागू नको नाहीतर तुला बघून घेईल अशी धमकी दिली. तसचे डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना येरवडा भागातील चंद्रमा नगर परिसरतील कॉमरझोन व पंचशील नगर येथे रविवारी घडली आहे.

याबाबत वसीम गनी सैय्यद (वय-40 रा. हिरामण मोझे नगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभी नागेश स्वामी व गणराज नागेश स्वारी (दोघे रा. पंचशिल नगर, चंद्रमा नगर, येरवडा) यांच्यावर आयपीसी 304, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक असून रविवारी कॉमरझोन येथे रिक्षा थांबवून चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी अभी स्वामी त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याकडे असलेल्या छऱ्याची बंदूक काढून वसीम यांच्या मानेला लावली. माझ्या नादाला लागू नको नाहीतर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी वसीम सय्यद आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी अभी याचा भाऊ गणराज याने टणक वस्तूने वसीम यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

10 वर्षापूर्वीच्या भांडणातून मारहाण

विश्रांतवाडी : दहा वर्षापूर्वी तू मला का मारले होते असे म्हणत दोन जणांनी एका युवकाला शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार विश्रांतवाडी येथील वडार वस्ती मध्ये रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला आहे. याबाबत बाबु अजगर सय्यद (वय-35 रा. गुंजाळ वस्ती, विश्रांतवाडी, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश देवकर व आकाश जाधव यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रागाने पाहतो म्हणून मारहाण

कात्रज : दोन दिवसांपूर्वी रागाने का पाहिले म्हणून एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने व दगडाने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील अंजनिनगर गणपती मंदिराजवळ घडला. याप्रकरणी प्रथमेश मंगेश जाधव (वय-19 रा. कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाल्या उर्फ ऋषिकेश संकपाळ (रा. कात्रज) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता 118(2), 118(1),115(2), 352, 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Posts