IMPIMP

Zika Virus In Pune | एरंवडणा आणि मुंढव्यात आतापर्यंत झिकाचे सहा रुग्ण आढळले

by sachinsitapure

पुणे : Zika Virus In Pune | शहरामध्ये झिका या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. यामध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. झिकाचा संसर्ग वाढू नये यासाठी रुग्ण आढळलेल्या घराच्या एक किलोमीटर परिसरातील घरांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत (Dr Kalpana Baliwant) यांनी दिली.

एडीस इजिप्टी या डासाच्या मादीकडून एडीस इजिप्टी संसर्गजन्य रोगाचा प्रचार होतो. शहरात एरंडवणा आणि मुंढवा परिसरात झिकाची लागण झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. एरंडवणा परिसरातील बाप लेकीला झिकाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परिसरातील १२ नागरिकांचे ब्लड सँपल प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आले असून यामध्ये दोन गरोदर महिलांनाही झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर मुंढवा येथे महिन्याभरापुर्वी एका महिलेला झिकाची लागण झाली होती. ही महिला उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालयाने ही बाब विलंबाने महापालिकेला कळविली. त्या ठिकाणी आणखी रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. बळीवंत यांनी दिली.

डॉ. बळीवंत यांनी सांगितले, की सर्व उमेदवारांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. परंतू प्राथमिक खबरदारी म्हणून रुग्ण आढळलेल्या परिसरातील एक कि.मी.परिघातील घरांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यूचा आजार पसरविणारे एडीस एजिप्टी डासांपासूनच झिकाचा फैलाव होतो. स्वच्छ पाण्यात पैदास होणार्‍या एडीस एजिप्टी डासांच्या प्रजननासाठी पावसाळी वातावरण पूरक आहे. यामुळे घरातील मनीप्लँट, फ्रीजच्या मागील ट्रेमध्ये फारकाळ स्वच्छ पाणी साठू देउ नका, छतावर रिकाम्या वस्तुंमध्ये तसेच घराच्या परिसरातील टाकाउ वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्या. एनआयव्हीच्या केंद्रीय अधिकार्‍यांनीही आज झिकाबाबत महापालिकेच्या डॉक्टरांना मार्गदर्शन केल्याचे डॉ. बळीवंत यांनी नमूद केले.

Related Posts