IMPIMP

ACB Trap On 2 Police Havaldar | लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

by sachinsitapure
Bundagarden Police Station

धाराशिव : – ACB Trap On Police Constables | येरमाळा पोलीस ठाण्यात (Yermala Police Station) दाखल असलेल्या एका प्रकरणात जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.26) सापळा रचून केली. येरमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश नामदेव चाफेकर (Prakash Namdev Chafekar) व चालक पोलीस नाईक महेश जालिंदर सांगळे Mahesh Jalander Sangle (वय-37) उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर असे लाच घेताना अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Dharashiv ACB Trap Case)

याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने धाराशिव एसीबीकडे सोमवारी (दि.24) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी चाफेकर याने सांगळे मार्फत तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता चाफेकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून सांगळे याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dharashiv Bribe Case)

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांच्या पथकाने केली.

Related Posts