IMPIMP

Chandan Nagar Pune Crime News | पुणे : कुक्कुटपालन व्यवसायाच्या बहाण्याने पैसे व दागिने घेऊन फसवणूक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे :  – Chandan Nagar Pune Crime News | कुक्कुटपालन व्यवसायाच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून रोख व ऑनलाईन 50 हजार रुपये घेतले. तसेच सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्ज काढून आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी साताऱ्यातील एका व्यक्तीवर चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 डिसेंबर 2022 ते 16 जून 2024 या कालावधीत खराडी येथे घडला आहे.

याबाबत संदीप भिमराव भोसले (वय-38 रा. न्यु लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दत्तात्रय बबन तावरे Dattatraya Baban Taware (वय-35 रा. कोल्हेवाडी रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांना कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असल्याने आरोपीने विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून रोख व ऑनलाईन 50 हजार रुपये घेतले.

त्यानंतर दोन दिवसांसाठी फिर्यादी यांच्या पत्नीचे सोन्याचे गंठण घेऊन गेला. सोन्याचे गंठण परस्पर तारण ठेवून त्यावर 1 लाख 29 हजार 500 रुपये सोने तारण कर्ज घेतले. फिर्यादी यांनी रोख रक्कम व सोन्याचे गंठण मागितले असता आरोपीने देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ट्रेडिंगच्या नावाखाली 38 लाखांची फसवणूक

पुणे : ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास कमी कालावधीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 38 लाख 74 हजार रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपधारक व मोबाईल धारक अद्वैत खन्ना याच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 20 मार्च ते 28 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts