IMPIMP

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे :  – Chandan Nagar Pune Crime News | तुमच्या विरोधात मनी लाँड्रिंगची केस (Money Laundering Case) दाखल आहे. तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल, अशी भीती दाखवून महिलेची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस कारवाईची भीती दाखवून महिलेला 13 लाख 83 हजार 781 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुरुवारी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खराडी (Kharadi) येथे राहणाऱ्या 52 वर्षीय महिलेने फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार 31 मे ते 7 जून 2024 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे. तुमच्या नावावर गैरप्रकार केला जात असून, त्यासाठी तुमचे आधार कार्ड व बँक खात्याचा वापर केला जात आहे. तुमच्या खात्यावरुन करोडो रुपयांची मनी लाँड्रिंग करण्यात आली आहे, असे सांगून एक लिंक पाठवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, असे सांगून अटकेची भीती दाखवली.

फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असल्याचे सांगून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर महिलेला 13 लाख 83 हजार 781 रुपये सांगितलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

ट्रेडिंगच्या बहाण्याने महिलेची 26 लाखांची फसवणूक

पुणे : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथील 44 वर्षीय महिलेची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी महिलेला 26 लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 3 एप्रिल ते 18 मे 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts