IMPIMP

Firing At Salman Khan Galaxy Apartment Case | सलमान खान गोळी प्रकरणातील आरोपीची तुरुंगात आत्महत्या

by sachinsitapure

मुंबई :  – Firing At Salman Khan Galaxy Apartment Case | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस कोठडीची पाहणी करण्यासाठी गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले.

सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. तर, या आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या सोनू चंदर व अनुज थापन यांना पंजाब मधून अटक केली होती. त्यापैकी अनुज थापन याने आज (बुधवारी) तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सलमानच्या वांद्र्यमधील गॅलेक्सी अपार्टमेंटवर बिष्णोई गँगच्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपींविरोधात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली. विकी गुप्ता, सागर पाल, अनुप थापन अशी या आरोपींची नावे असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील अनुप थापनने आज पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लॉकअपमध्ये आत्महत्या केली.

बिष्णोईच्या भावाने घेतली होती जबाबदारी

14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर मुंबई पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले होते. या घटनेत 72 तासाच्या आत पोलिसांनी गुजरातमधून आरोपींना अटक केली.

Bibvewadi Pune Crime News | पुणे : वाहन तोडफोड प्रकरणात बिबवेवाडी पोलिसांकडून चार जणांना अटक (Video)

Related Posts