IMPIMP

Hadapsar Pune Crime News | पुणे: फसवणूक करुन सावकारी केस करण्याची धमकी, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : –  Hadapsar Pune Crime News | वेगवेगळे इन्वेस्ट प्लॅन सांगून तसेच कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न भेटतात असे सांगून एका दाम्पत्याने एका व्यक्तीची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). तसेच पैशांची मागणी केल्यानंतर सावकारी कायद्याची केस करण्याची धमकी दिली. हा प्रकार मांजरी बुद्रुक (Manjari Budruk) परिसरातील झेड कॉर्नर येथील गोविंदा हाईट्स येथे जून 2020 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला आहे.

याबाबत सुरेश नारायण कोटा (वय-39 रा. गोविंदा हाईट्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश शिंदे, वैभवी मंगेश शिंदे यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला एम.डी.आय नेटवर्क एक्स.एल.सी. प्रा. लि. विमाननगर या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतात असे सांगितले.

तसेच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला इन्वेस्ट करण्यासाठी प्लॅनचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 14 लाख 36 हजार 322 रुपये दिले. त्यापैकी 11 लाख 84 हजार रुपये परत देऊन उर्वरीत 2 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्य़ादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी अरेरावी केली. तसेच पैसे मागितले तर सावकारी कायद्याची केस टाकतो, माझे काका पीएसआय आहेत, तुम्हाला इंगा दाखवतो अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts