IMPIMP

Khadki Pune Crime News | पुणे: लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिघांची 29 लाखांची फसवणूक, तोतया लष्करी अधिकाऱ्यावर FIR

by sachinsitapure

पुणे : – Khadki Pune Crime News | भारतीय लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून (Lure Of Job In Indian Army) एकाच कुटुंबातील तिघांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तिघांची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी Southern Command Military Intelligence, Pune आणि पुणे पोलिसांनी पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातापा रामचंद्र वागरे (वय-46 रा. करंजफेल शिरोली ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदिप बळवंत गुरव Sandeep Balwant Gurav (वय- 39 रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध आयपीसी 406, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 जून 2020 ते 12 जुलै 2021 या कालावधीत मिलीटरी हॉस्पिटल खडकी येथे घडला आहे.

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. आरोपी संदीप गुरव याची साथीदार अश्विनी पाटील हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सरु आहे. आरोपी गुरव याने तिघांना खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये (Khadki Military Hospital) नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साताप्पा वाघरे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर येथील राधानगरी आगार येथे वाहक (कंटक्टर) म्हणून काम करतात. 2020 मध्ये एका मित्रामार्फत त्यांची संदीप गुरव याच्यासोबत ओळख झाली. गुरव हे आर्मीमधून सेवानिवृत्त झाले असून त्यांची मोठी ओळख असून वेगवगेळ्या पदावर नोकरी लावण्याचे ते काम करतात असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा भाचा हा आर्मी भरतीची तयारी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी संदीप कडे भाच्याला आर्मीत नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

त्यानंतर संदीप याने वाघरे यांना त्यांच्या भाच्याला घेऊन खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे येण्यास सांगितले. कुटुंबातील तीन जणांनी भेट घेतली. संदीप याने तिघांचे नोकरीचे काम होईल असे सांगितले. मात्र, प्रत्येकी बारा लाख रुपये प्रमाणे 36 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्यानुसार फिर्यादी यांच्यसह तिघेजण नोकरीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी आले असता मिलिटरी हॉस्पिटलच्या गेटवर त्यांना नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. संदीप गुरव याने पैसे घेऊन नियुक्तीचे बनावट पत्र देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. आरोपी संदीप याने इतर काही जणांची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts