IMPIMP

Lashkar Pune Crime News | पुणे: खरेदीच्या बहाण्याने आले अन् लाखाचे दागिने चोरून नेले

by sachinsitapure

पुणे :  – Lashkar Pune Crime News | खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी एका सराफी दुकानातून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना लष्कर परिसरात असलेल्या रुपकला ज्वेलर्स या दुकानात सोमवारी (दि.24) दुपारी सव्वा बारा ते पावणे एकच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

याबाबत प्रणव अश्विन सोलंकी (वय 24, रा. कुमार श्रीधर सोसायटी, मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी यांचे सेंटर स्ट्रीट कॅम्प परिसरात रुपकला ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास एक महिला आणि तिचा साथीदार सोन्याची चैन खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. प्रणव यांनी एक लाख 10 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची चैन दाखवली. त्यानंतर प्रणव दुकानातील इतर ग्राहकांशी बोलत होते. त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून चोरट्यांनी हात चलाखीने दीड तोळ्याची सोन्याची चैन लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रणव यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लॅपटॉप, मोबाईल रोख रक्कम लंपास

मुंढवा : मुंढवा परिसरात राहणाऱ्या मयुर संपत धनावडे (वय-28 रा. साई पार्क, मुंढवा) यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी तीन लॅपटॉप, दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी साडे आठ च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडे तोडून 60 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ प्लाझा, कदमवाकवस्ती येथे घडला आहे. याप्रकरणी अनिल कुमार लज्जाराम (वय-33) यांनी फिर्याद दिली आहे.

Related Posts