IMPIMP

Lonikand Pune Crime News | फ्लॅट खरेदीत 40 लाखांची फसवणूक; लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : – Lonikand Pune Crime News | फ्लॅटचा रीतसर व्यवहार करुन 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅट विक्रीपूर्व तो फ्लॅट बँकेत तारण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती न देता आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार वाघोली येथील आर.पी.एस. हेरिटेज या गृहप्रकल्पामध्ये 14 नोव्हेंबर 2018 ते 26 जून 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजेश यशवंत चिवेलकर (वय-42 रा. कांचन पुरम सोसायटी, बायफ रोड, वाघोली) यांनी गुरुवारी (दि.27) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निर्मलकुमार शर्मा (रा. शिवशक्ती अपार्टमेंट, लोहगाव-वाघोली रोड, वाघोली) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नावावर वाघोली येथील आर.पी. एस हेरिटेज गृहप्रकल्पातील टू बीएचके फ्लॅट होता. तो फ्लॅट फिर्यादी राजेश चिवेलकर यांना नोव्हेंबर 2018 मध्ये दस्त करुन 40 लाख रुपयांना विकला. दरम्यान, आरोपीने हा फ्लॅट इंडिया होम लोन फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून त्यावर मार्च 2017 मध्ये कर्ज घेतले होते. फिर्यादी यांना फ्लॅटची विक्री करताना कर्ज घेतल्याचे फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts