IMPIMP

Lonikand Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आईसह तिघांवर गुन्हा

by sachinsitapure

पुणे :  Lonikand Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बालात्कार (Rape Case Pune) करुन तिचे न्यूड फोटो (Nude Photos) काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आईच्या मित्राने घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आईला सांगितले असता आईने पीडित मुलीला बेदम मारहाण करुन पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च 2024 मध्ये घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) आईसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित मुलीने बुधवारी (दि.1) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अविनाश शेळके, गोविंद काकडे (दोघे रा. वाघोली) व पीडित मुलीच्या 36 वर्षीय आईवर आयपीसी 376/2/एन, 354, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पीडित मुलीच्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वाघोली येथील एका कापड दुकानात काम करते. दुकानात काम करत असताना आरोपी अविनाश शेळके याच्यासोबत तिची ओळख झाली. अविनाश याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवताना तिचे न्युड फोटो मोबाईलमध्ये काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार तीच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, आईचा मित्र गोविंद काकडे याने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घरी येऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलीने आईला सांगितले. त्यावेळी आईने गोविंद याचे नाव कोठेही घेयचे नाही असे सांगून मुलीला बेदम मारहाण केली. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही. दरम्यान, मुलीला मागील चार दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी (API Vijay Wanjari) करीत आहेत.

Pune Lok Sabha | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयाला निरीक्षकांची भेट

Related Posts