IMPIMP

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | पुण्यातील युवकाला महसुल विभागात (Revenue Department) नोकरी लावण्याच्या (Lure Of Job) बहाण्याने 28 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. युवकाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Pune Collector Office) नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र (Fake Appointment Letter ) देण्यात आले. फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समाधान रमेश सोनवणे (वय-33 सध्या रा. महादेवनगर, उरुळी कांचन मुळ रा. मु.पो. कळमडु ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सिद्धार्थ देविदास झेंडे (Siddharth Devidas Zende) व त्याची पत्नी सीमा सिद्धार्थ झेंडे (दोघे रा. म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर) यांच्यावर आयपीसी 406, 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान सोनवणे हे सध्या विमानगर येथील मॅग्नेस स्क्वेअर बिजनेस हॉटेल, साकोरे नगर येथे नोकरी करतात. 26 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत आरोपी हॉटेलमध्ये राहण्यास आले. त्यावेळी त्यांनी समाधान याच्यासोबत ओळख करुन घेतली. समाधान यांना विश्वासात घेऊन महसूल विभागात, मंत्रालय तसेच मंत्र्यांच्या ओळखी असल्याचे भासवले. समाधान यांना महसुल विभागात सहाय्यक लिपिक पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी आरोपींनी समाधान यांच्याकडून बँक खात्यात व रोख स्वरुपात 28 लाख 78 हजार रुपये घेतले.

त्यानंतर फिर्य़ादी यांना सहाय्यक लिपीक पदाचे जिल्हाधिकारी कार्य़ालय पुणे यांचे नियुक्ती पत्र दिले. मात्र, बनावट नियुक्तीपत्र असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर करून घेतले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समाधान सोनवणे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करीत आहेत.

Pune Parvati Crime | पुणे : लघुशंका करण्यावरुन दोन गटात राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Related Posts