IMPIMP

Pune Crime | सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण ! जबरदस्तीने ऐवज काढून घेतला, कोंढव्यातील घटना

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राजेंद्र संगय्या हिरेमठ (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी),
अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १० सप्टेबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी (Bibvewadi) व कोंढव्यात (Kondhwa) घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईल वर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते.
हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी त्यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो,
अशी धमकी दिली होती.
त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नी करुन फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली.
फिर्यादी यांना चारचाकी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले.
गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) केली.
त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले
असा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | Kidnapping for recovery of Rs 4 lakh lost in bets! Forcibly removed the loot, incident in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

India Vs Pakistan | भारत-पाकिस्तान सिरीज होणार का? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

 

Related Posts