IMPIMP

Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | पुणे पोर्शे अपघातप्रकरणी रवींद्र धंगेकरांचे फडणवीस आणि पोलिसांवर आरोप; मोहोळांनी दिले प्रत्युत्तर, ”पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखतात”

by sachinsitapure

पुणे : Murlidhar Mohol On Ravindra Dhangekar | लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच!, असे म्हणत भाजपाचे लोकसभेचे उमेदवार (pune Lok Sabha) मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना एक्सवर पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे. पुणे पोर्शे अपघातप्रकरणी धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पुणे पोलिसांवर (Pune Police) काही आरोप केले होते, त्यावर मोहोळ यांनी हा टोला लगावला आहे. (Porsche Car Accident Pune)

मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील पोस्टवर पुढे म्हटले आहे की, कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग ते प्रकरण न्यायालयात जातं. (Kalyani Nagar accident Pune)

तसेच मोहोळ यांनी पोर्शे अपघातप्रकरणातील एफआयआरची १९ मे रोजीची प्रत शेअर करत म्हटले आहे की, मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम ३०४ हे पहिल्यापासून लावले आहे. ही १९ तारखेची प्रत पाहा आणि साप-साप म्हणून भुई धोपटणे हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, असा टोला मोहोळ यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते रवींद्र धंगेकर…

पुण्यातील पोर्श कार अपघाताप्रकरणी पोलीस आणि प्रशासनावर गंभीर आरोप होत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू मांडली होती. याबाबत रवींद्र धंगेकर म्हणाले, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला. त्याचबरोबर अपघातानंतर ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नव्हते.

काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. त्यातली पहिली बाब म्हणजे, अपघाताची घटना घडल्यानंतर पहिल्या एफआयआरमध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही.

अर्थात ही येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी शोधलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर कलम ३०४ अ आणि कलम ३०४ ची नोंद करण्यात आली.

राज्याच्या गृहमंत्र्यांना गुन्हा दाखल केल्याची पहिली प्रत बदलण्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि त्या बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आपलं पुणे शहर वाचवण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. अधिकारी – मंत्री तर निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्यातील पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचं काम करेल, असे धंगेकर यांनी म्हटले होते, या टीकेला मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ACB Trap On Police Constable | लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Related Posts