IMPIMP

Pune Crime News | मोबाईलचे पैसे पाठवल्याचे भासवून फसवणूक, पुण्यातील पॅव्हेलियन मॉलमधील घटना

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : – Pune Crime News | ऑनलाईन मोबाईल फोन बुक करुन ऑनलाईन पैसे पाठवल्याचे भासवून एक लाख 12 हजार 997 रुपयांचे तीन महागडे मोबाईल नेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवर (SB Road Pune) असलेल्या पॅव्हलियन मॉल (Pavillion Mall Pune) मधील सॅमसंग कॅफेत 24 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 26 एप्रिल सायंकाळी पाच या वेळेत घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवम अनंत वालगुडे (वय-22 रा. बालाजी पार्क, आंबेगाव बुद्रुक) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन विजय भालेराव या व्यक्तीवर आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे पॅव्हेलियन मॉलमध्ये सॅमसंग कॅफे नावाचे माबाईल विक्रीचे दुकान आहे.

आरोपींनी तीन मोबाईल फोन पोर्टर द्वारे ऑनलाईन बुक करुन ते फिर्यादी यांच्या दुकानातून घेऊन गेले. मोबाईल घेताना फिर्यादी यांनी पैशांबाबत विचारणा केली असता ऑनलाईन पैसे जमा केल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना पैसे जमा झाले नसल्याचे समजले. त्यांनी विजय भालेराव याच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन विचारणा केली. त्यावेळी त्याने वीस हजार रुपये दिले. मात्र उर्वरीत 92 हजार 997 रुपये अद्याप पर्यंतं दिले नाही.

याबाबत फिर्यादी यांनी आरोपीच्या आईला फोन करुन पैशांबाबत विचारणा केली. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पैसे देऊ असे सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत पैसे दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवम वालगुडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts