IMPIMP

Pune Crime News | भांडण सोडवायला गेला आणि जीव गमवून बसला, विश्रांतवाडीतील घटना

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यातील वाद सोडवणे एकाच्या जीवावर बेतले आहे. भांडणे सोडविणाऱ्या एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरातील घडली. प्रशांत नारायण शिंदे (वय-45 रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय शेलार (वय-33 रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी) याच्यासह चौघांना अटक केली आहे. याबाबत विनोद नारायण शिंदे (वय-43) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

आरोपी अभय शेलार आणि प्रशांत शिंदे शेजारी आहेत. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास अभयच्या आई- वडिलांचा वाद सुरु होता. त्याची आई प्रशांतच्या घरी आली. माझा नवरा वाद घालतो. त्याला समजावून सांगा, असे तिने प्रशांतला सांगितले. त्यानंतर प्रशांत अभयच्या घरी गेला. प्रशांतने त्याच्या वडिलांना समजावून सांगितले. प्रशांतने मद्यपान केले होते. दारुच्या नशेत त्याने अभयच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर अभयच्या वडिलांनी या घटनेची माहिती अभयला दिली. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास अभय, त्याचे मित्र निखिल, अभिजीत, सुमित यांना घेऊन आला. त्या चौघांनी प्रशांतला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर आरोपी अभय आणि त्याचे मित्र तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode), वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (Sr PI Kanchan Jadhav) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री चार जणांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन खंदारे (PI Mohan Khandare) करीत आहेत.

Related Posts