IMPIMP

Pune Crime News | पुणे : त्रास का देतो म्हणाल्याने दाम्पत्याला मारहाण, तिघांना अटक

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | सोसायटीच्या लिफ्टचा दरवाजा उघडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास का देतो अशी विचारणा केल्याच्या कारणावरुन तिघांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.4) मंगळवार पेठेत (Mangalwar Peth Pune) घडला आहे.

याबाबत चेतन गणपत घावटे (वय-36 रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कादर महंमद अली शेख, त्याची पत्नी व बिलाल शेख (तिघे रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आरोपी यांचा मुलगा तळमजल्यावर सोसायटीची लिफ्ट उघडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा करत होता. त्यावेळी फिर्यादी यांनी तु एवढी गर्दी असताना लिफ्ट उघडी ठेवून लोकांना त्रास का देतो? अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करुन फिर्य़ादी यांच्या घरासमोर जाऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांची पत्नी घाबरुन एका घरात गेली असता आरोपींनी तिचा पाठलाग केला. घरातील काच घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्य डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या पत्नीचे केस धरुन मारहाण केली. चेतन घावटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

किरकोळ कारणावरुन मारहाण

पुणे : किरकोळ कारणावरुन एका 53 वर्षीय व्यक्तीला चुलीत जळत असलेल्या लाकडी फळीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेत घडला आहे. याबाबत राजेंद्र पांडुरंग भांड (वय-53 रा. रायकरमळा धायरी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ऋषिकेश दिपक भांड (रा. भांडवाडा, नेहार चेंबर, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे.

टॉयलेट मधून बाहेर येण्यास उशीर लावल्याने आरोपी भांड याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच चुलीत जळत असलेल्या फळीने मारहाण केली. यामध्ये जळत्या फळीचे चटके बसून फिर्यादी जखमी झाले. आरोपीने फिर्यादी यांना बाहेरची पोर आणून मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत

Related Posts