IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – भांडणे सोडविण्यास गेलेल्या कंपनी मालकाच्या डोक्यात दगड घालून केला खून

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Mundhwa Police Station - A company owner who went to settle a dispute was killed by throwing a stone on his head

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | कंपनीच्या बाहेर रोडवर   भांडण   करणार्‍याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मालकालाच भांडणार्‍यांनी कोयत्याने वार करुन त्यांचा खून (Murder in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा-केशवनगरमध्ये (Mundhwa-Keshav Nagar) घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रवींद्र दिगंबर गायकवाड Ravindra Digambar Gaikwad (वय ६०, रा. गायकवाड आळी, मुंढवा) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Pune Police) मोटारसायकलवरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

 

आकाश जावळे (वय १९), सागर जावळे (वय २२), साहिल सुतार (वय १९, तिघेही रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी सुन्द्रेंश सुभाषचं जैस्वार (वय ३९, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२३) दिली आहे. हा प्रकार मुंढवा येथील केशवनगरमधील गायकवाड वस्ती येथे रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रवींद्र गायकवाड यांची कल्याणी इंजिनिअरिंग (Kalyani Engineering) ही कंपनी आहे. फिर्यादी या ठिकाणी कामाला आहेत. कंपनीच्या बाहेर रोडवर रविवारी दुपारी तिघे जण आपसात भांडत होते. ते पाहून गायकवाड तेथे गेले. त्यांनी भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी गायकवाड यांच्यावरच कोयत्याने डोक्यात,पाठीवर वार केले. दगडाने मारहाण करुन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. जखमी अवस्थेत गायकवाड यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime News | Pune Crime News: Mundhwa Police Station – A company owner who went to settle a dispute was killed by throwing a stone on his head

 

हे देखील वाचा :

Pune Crime Fire News | सातारा रोडवरील इंद्रनील सोसायटीमधील चार दुकाने भीषण आगीत जळून खाक; दोघे जण जखमी, स्फोटाने दुमजली इमारतीत पडझड (Video)

Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन

 

 

Related Posts