IMPIMP

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

by nagesh
Pune Crime | Driver demands body comfort from 28-year-old woman on road, youth from Bibwewadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  मोटारीतून जाताना वडापाव खाण्याची तलफ एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. वडापाव आणण्यासाठी गेलेल्या महिलेने त्यांची पर्स गाडीत (Pune Crime) ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पर्स चोरून (women purse theft) नेली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 8 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना पुण्यात (Pune Crime) 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतील अहिल्यादेवी चौकात घडली आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सहकारनगर मध्ये राहतात.
दोन दिवसांपूर्वी त्या कारमधून घराकडे जात होत्या. त्यावेळी धनकवडीतील अमृततूल्य दुकानासमोर महिला वडापाव घेण्यासाठी थांबल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्याकडे असलेली पर्स त्यांनी कारच्या डाव्या सीटवर ठेवली होती.
याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांची पर्स चोरुन नेली.
चोरट्यांनी 8 तोळे वजनाचे दागिने, 10 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 1 हजार रुपयाची पर्स असा एकूण 8 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | pune women purse theft in sahakarnagar

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | तरुणीनं लग्नासाठी दिला नकार; संतापलेल्या तरुणांने केलं विकृत कृत्य

Mumbai Crime | 13 वर्षाच्या भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत होती बहिण, पुढं झालं असं काही

Bank News | बँकेशी संबंधित लोकांसाठी खुशखबर ! घरबसल्या मिळतोय 10 लाख रुपयांचा फायदा, लवकर करा ‘हे’ काम; जाणून घ्या

 

Related Posts