IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयता गळ्याला लावून लुटमार, वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | धारदार कोयता गळ्याला लावून तरुणाला लुटून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police Station) अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.24) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मोशी येथील पलाश सोसायटीच्या समोर घडली. (Arrest In Robbery Case)

ऋषिकेश युवराज बनसोडे (वय-21 रा. साई कॉलनी, लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साकेत चंद्रशेखर भिमनळे (वय-21 रा. इंद्रायणी पार्क कॉलनी, तुपे वस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 392, 427, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Koyta Gang)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे याने त्याच्या हातातील धारदार कोयता फिर्यादी साकेत यांच्या गळ्याला लावून त्यांच्या खिशातून हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेला टेम्पो व इतर पाच वाहनांच्या काचांवर कोयता मारुन तोडफोड केली. आरोपीने कोयता हातात घेऊन सार्वजनिक रोडवर मोठमोठ्याने आरडाओरडा करत हातातील कोयता हवेत फिरवून दहशत पसरवली. फिर्यादी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करत आहेत.

Related Posts