IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘हमारा भाई जेल से छूट गया’ बाईक रॅली काढणाऱ्या 8 जणांना अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | कारागृहात रवानगी झालेल्या व जेल मधून सुटलेल्या गुन्हेगाराच्या साथीदारांनी चिंचवड परिसरामध्ये रॅली काढून दहशत पसरवली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल करुन आठ जणांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.3) रात्री पावणे नऊच्या सुमारास इंदिरानगर चिंचवड (Indira Nagar Chinchwad) येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे.

याबाबत पोलीस शिपाई आनंद बजबळकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. आकाश गणपत चव्हाण (वय-27), आकाश उर्फ काकडी सुरेश दांगडे (वय-27), करण उर्फ छोटु अनिल धोत्रे (वय-22), राहुल उर्फ काळ्या नागनाथ कुऱ्हाडे (वय-25), सतीश उर्फ बांगो बाळु दांगडे (वय-28), ऋषिकेश गेमु राठोड (वय-23), महेश उर्फ मामु राजु विटकर (वय-23), अक्षय नेताजी मोरे (वय-28 सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश मंगळु राठोड (वय-28), उमेस धर्मा राठोड (वय-28), राजेश भगवान पवार (वय-29), महेश मलकाप्पा पुजारी (वय-28), तुषार बाळु मांजाळकर (वय-30 सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 279, 341, 504, 506, 143, 147, 149 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या साथीदाराला अटक करुन त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, तो जेलमधून बाहेर आला आहे. साथीदार जेलमधून बाहेर आल्याच्या कारणावरून आरोपींनी इंदिरानगर परिसरातील सार्वजनिक रोडवर मोटार सायकल रॅली काढली. हतात काठ्या, व कोयते घेऊन रॅली काढून मोटार सायकलेचे हॉर्न वाजवून रस्त्यावरुन जाणऱ्या-येणाऱ्या लोकांना शिवीगाळ केली. तसेच परिसरात राहणाऱ्या लोकांना शिवीगाळ करुन रस्त्यातून बाजूला होण्यास सांगून अरेरावीची भाषा वापरली.

‘हमारा भाई जेल से छुट गया, अभी हम दुश्मन को देख लेंगे’ असे म्हणत आरोपींनी हातातील काठ्या व कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. आरोपींच्या दहशतीमुळे परिसरातील लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. तर पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल शेटे करीत आहेत.

Related Posts