IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: धनादेशात खाडाखोड करुन सोसायटीला 7 लाखांची फसवणूक, दोघांवर FIR

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | कामासाठी दिलेल्या धनादेशावर खाडाखोड करून सात लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दोन जणांवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2020 ते 23 मे 2024 या कालावधीत ब्ल्यु रिज सोसायटीत घडला आहे.

याबाबत कियत जयप्रकाश नायर (वय-60 रा. ब्ल्यु रिज सोसायटी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोविंद बळीराम कांबळे Govind Baliram Kamble (मुळ रा. बालाजी नगर, उमरगा, उस्मानाबाद), हंसजराज भिम काळे (पूर्ण पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कियत नायर हे राहत असलेल्या ब्ल्यु रिज सोसायटीच्या देखभालीचे काम मुनीस या कंपनीला दिले आहे. मुनीस या कंपनीचा कर्मचारी आरोपी गोविंद याला सोसायटीने 33 हजार 570 रुपयांचा धनादेश दिला होता. त्या धनादेशावर खाडाखोड करीत सात लाख 70 हजार रुपयांचा धनादेश आरोपी हंसराज याच्या नावावरील खात्यात भरत फिर्यादी व त्यांच्या सोसायटीची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts